माझी बहिण निबंध मराठी My Sister Essay in Marathi

माझी बहिण निबंध मराठी My Sister Essay in Marathi: माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी बहिण सुरूचीता. ती माझी मोठी बहीण आहे . लहान असल्यापासून आम्ही सोबत आहोत. या निबंधातून मी ती कशी दिसते, तिचे व्यक्तिमत्त्व आणि काहाई विशेष गोष्टी आणि सोबतच माझे तिच्याशी असलेले प्रेमळ नाते यांचे वर्णन करणार आहे.

माझी बहिण निबंध मराठी My Sister Essay in Marathi

माझी बहिण निबंध मराठी My Sister Essay in Marathi

शारिरीक वर्णन

सुरुचीता ही उंच आणि सडपातळ आहे. तिचे केस लांब सडक असून डोळे तपकिरी आहेत. तिच्या डाव्या गालावर हसल्या नंतर एक विशेष खळी दिसते. तिच्या सौंदर्यात भर टाकणारी गोष्ट म्हणजे तिचे स्मितहास्य होय. तिच्या स्मित दिल्यानंतर खुलनारे रूप सुंदर आहे.

व्यक्तिमत्व आणि विशेषतः

सुरीचीता एक दयाळू आणि प्रेमळ व्यक्ती आहे. ती कायम इतरांना मदत करण्यासाठी तयार असते. ती विनोदी व्यक्तिमत्त्व असून नेहमी मला हसवत असते. ती खूप हुशार असून मेहनती देखील आहे. सध्या ती डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत आहे. ती खूप जास्त व्यस्थ  असून देखील प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढते. तिच्याकडे तिच्या व्यस्त वेळापत्रकातून मित्रांसाठी वेळ नक्की असतो.

माझ्याशी संबंध

सुरूचिता आणि मी नेहमीच सोबत असतो. आम्ही अनेक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण सोबत अनुभवले आहे. बहीण भावातील नात्याप्रमाने आमचे हे नाते एक विशेष बंधन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांवर विश्वास ठेवणे हे आम्ही करतो. माझ्यासाठी ती आदर्श आहे. सतत तिचे अनुकरण करण्याचे प्रयत्न मी करतो. प्रत्येक वेळी योग्य सल्ला देण्याचे काम ती करते. माझ्या प्रत्येक निर्णयाला तिचा पाठिंबा हा नक्की असतो. मी खरंच भाग्यवान आहे कारण ती माझी बहिण आहे.

निष्कर्ष

माझी बहिण सरूचीता ही सुंदर, दयाळू आणि हुशार देखील आहे. माझ्या आयुष्यावर एक सकारात्मक प्रभाव तिचाच आहे. माझी बहिण ती असल्याचा मला अभिमान आहे. मला आमच्या नात्याची खूप गरज आहे. मी तिच्यासोबत अजून काही वर्षांच्या विनोदाची, प्रेमाची आणि अनुभवांची वाट बघतो आहे.
About Author: